Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

रोज आज काय बनवायचं चा कंटाळा आलाय? हा आहे मेन्यू फॅटिक

Дата публикации: 17-08-2026 05:32:45

सकाळी उठल्यापासून घरातली अनेक कामं सुरू होतात. पण त्यातला एक प्रश्न असा असतो, जो रोज नव्याने डोकं खाऊ लागतो ‘आज जेवायला काय बनवायचं?’ घरात भाजी, डाळ, तांदूळ, पीठ सगळं असूनही काय करावं हे सुचत नाही. काल काय बनवलं होतं, उद्या काय बनवायचं आहे, मुलांना काय आवडेल, घरच्यांना काय खायचं आहे, हे सगळं विचारताना स्वयंपाक सुरू […]

Основное содержимое страницы с новостью.

menu fatigue daily cooking decision stress how to manageमेन्यू फॅटिक

सकाळी उठल्यापासून घरातली अनेक कामं सुरू होतात. पण त्यातला एक प्रश्न असा असतो, जो रोज नव्याने डोकं खाऊ लागतो ‘आज जेवायला काय बनवायचं?’ घरात भाजी, डाळ, तांदूळ, पीठ सगळं असूनही काय करावं हे सुचत नाही. काल काय बनवलं होतं, उद्या काय बनवायचं आहे, मुलांना काय आवडेल, घरच्यांना काय खायचं आहे, हे सगळं विचारताना स्वयंपाक सुरू होण्याआधीच डोकं थकून जातं.

यालाच साध्या भाषेत ‘मेन्यू फॅटिक’ म्हणतात. म्हणजेच रोजच्या जेवणासाठी सतत नवीन पर्याय ठरवण्याचा मानसिक कंटाळा आणि त्यातून येणारा निर्णयांचा ताण. हा वैद्यकीय आजार नसून रोजच्या निर्णयांमुळे निर्माण होणारी मानसिक ताणाची भावना समजून घेण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे.

रोजचा मेन्यू ठरवणं अवघड का?
स्वयंपाक ही फक्त पदार्थ बनवण्याची प्रक्रिया नाही. त्याआधी काय बनवायचं, साहित्य आहे का, किती जणांसाठी करायचं, वेळ किती आहे आणि सगळ्यांच्या आवडी कशा जुळवायच्या याचा विचार करावा लागतो. त्यामुळे दररोज नवीन निर्णय घेण्याची जबाबदारी कंटाळवाणी होऊ शकते. विशेषतः घरातील जेवणाचं नियोजन मुख्यतः एका व्यक्तीवर असेल, तर हा मानसिक भार आणखी जाणवू शकतो.

मेन्यू फॅटिकची चिन्हं
दररोज तोच पदार्थ करावासा वाटणे, नवीन रेसिपी पाहूनही काहीच सुचत नसणे, किराणा आणताना गोंधळणे किंवा शेवटच्या क्षणी बाहेरून जेवण मागवणे अशी लक्षणं जाणवू शकतात. काही वेळा स्वयंपाकाची आवड असलेल्या व्यक्तीलाही रोजच्या नियोजनाचा कंटाळा येऊ शकतो.

हा ताण कसा कमी करावा?
आठवड्याचा साधा मेन्यू ठरवा. प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे पदार्थ शोधण्याऐवजी आठवड्याचे काही बेसिक पर्याय आधीच ठरवून ठेवा.
एकाच पदार्थाचा वेगळा वापर करा. उरलेल्या भाजीपासून पराठा, पोळीपासून रोल म्हणजेच एखाद्या पदार्थापासून दुसरा पदार्थ करता येतो का हे बघा त्यामुळे अन्नाची नासाडीही कमी होते. घरात ‘आवडते पदार्थ’ यांची यादी ठेवा. 15 ते 20 सोपे पदार्थ लिहून ठेवल्यास रोज नव्याने विचार करण्याची गरज पडत नाही.

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1Багаевская: День 18 дек, Вт0017-12-2018
2Уважаемые односельчане ! В преддверии празднования 80 - летия Великой ...0021-02-2025
3Багаевская: Утро 18 дек, Вт0017-12-2018
4Стоило бы поспешить0014-10-2021
5🇷🇺Для учеников 9б класса прошло увлекательное занятие профориентационного курса «Россия ...0027-02-2025
6Следователи в сопровождении спецназа пришли с обысками на объекты Светлоярского водоканала0024-01-2020
7💥Чемпион WBC в легком весе американец Шакур Стивенсон поделился тем, ...0027-02-2025
8Губерниев заявил, что Логинов выступает чистым0025-02-2020
9Брянцев удивили битые яйца в «Магните»0025-02-2020
10Η πιο «κουλ» εταιρεία στον κόσμο βρίσκεται στο Λονδίνο -Προτείνει στους εργαζομένους να παίρνουν όση άδεια μετ’ αποδοχών θέλουν0018-11-2021

Классификация: . Схожих патентов: 0. Схожих новостей: 10. Тональность: 0. Информативность: 7.44. Источник: www.mymahanagar.com.