Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

दानशूरता

Дата публикации: 08-08-2026 20:30:18

सुनील शिरवाडकर बिल गेट्स यांनी 2000 साली मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला.. आणि 2020 साली संचालक मंडळाचाही राजीनामा दिला.. आणि पूर्णवेळ त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलं.. आपली पत्नी मेलिंडा यांच्यासह ‘बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ची स्थापना केली..ही जगातील सर्वात मोठी धर्मादाय संस्था मानली जाते.. आपल्या संपत्तीमधील जवळपास 90 टक्के संपत्ती त्यांनी दान करण्याचे जाहीर केले […]

Основное содержимое страницы с новостью.

सुनील शिरवाडकर

बिल गेट्स यांनी 2000 साली मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला.. आणि 2020 साली संचालक मंडळाचाही राजीनामा दिला.. आणि पूर्णवेळ त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलं.. आपली पत्नी मेलिंडा यांच्यासह ‘बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ची स्थापना केली..ही जगातील सर्वात मोठी धर्मादाय संस्था मानली जाते.. आपल्या संपत्तीमधील जवळपास 90 टक्के संपत्ती त्यांनी दान करण्याचे जाहीर केले आहे..ते म्हणतात..मी माझ्या मुलांना फक्त 10 मिलीयन डॉलर ठेवून बाकी संपत्ती दान करणार आहे..


दानशूरता म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम नाव आठवतं ते कर्णाचं..पण हे झालं पौराणिक काळातलं.. सध्याच्या काळात दानशूरता म्हटलं की डोळ्यांसमोर नाव येतं ते बिल गेट्सचं..कर्णाप्रमाणेच त्यांनी आपली जवळपास सगळी संपत्ती उदारपणे समाजामध्ये वाटण्याचा संकल्प केला आहे..28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन राज्यातील सीएटल येथे बिल गेट्स यांचा जन्म झाला.. अत्यंत बुद्धिमान आणि जिज्ञासू वृत्तीचे बिल.. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानाची आवड..

1973 साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.. तसं पाहिलं तर वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा संगणकाशी पहिला परिचय झाला होता..आता हार्वर्डमध्ये अ‍ॅडमिशन घेतली होती..पण मन मात्र संगणकाकडे ओढ घेत होतं..येथेच त्यांना एक मित्र भेटला.. त्याचं नाव अ‍ॅलन पॉल..दोघांचे विचार चांगले जुळायचे.. दोघांच्या लक्षात एक गोष्ट आली होती.. पुढचं युग हे पर्सनल कॉम्प्युटरचं असणार आहे.. आणि त्यासाठी गरज भासणार आहे ती सॉफ्टवेअरची.. आणि म्हणूनच या दोघांनी एक धाडसी निर्णय घेतला.. हार्वर्ड विद्यापीठ सोडण्याचा..

4 एप्रिल 1975 या दिवशी बिल गेट्स आणि अ‍ॅलन पॉल यांनी एका कंपनीची स्थापना केली..मायक्रो कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर या दोन शब्दांचं एकत्रीकरण करून त्यांनी कंपनीचं नाव ठेवलं.. ‘मायक्रोसॉफ्ट’..संगणकासाठी प्रोग्रामिंग भाषा आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम मायक्रोसॉफ्टने सुरू केलं..1980 साली आयबीएम या जगप्रसिद्ध कंपनीने मायक्रोसॉफ्टला एक मोठं काम दिलं.. ते काम होतं.. पर्सनल कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याचं.. आणि मग त्यांना मागे वळून बघावेच लागले नाही..

1985 साली त्यांनी ‘विंडो 1.0’ लॉन्च केलं.. आणि मग मायक्रोसॉफ्टच्या यशाचा वारू चौफेर उधळला.. विंडोज 95.. विंडोज 98.. ते अगदी आजच्या विंडोज 11पर्यंत.. जगातील 90 टक्क्यांहून अधिक संगणकावर राज्य केलं ते मायक्रोसॉफ्टने..मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या प्रणालीने कार्यालयीन कामं सुलभ झाली.. अगदी सामान्य माणसांपर्यंत संगणक पोहोचवला.. अगदी घराघरात.. या अभुतपूर्व यशाने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले..1995 ते 2007 या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या क्रमांकावर ते राहिले..

बिल गेट्स यांनी 2000 साली मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला.. आणि 2020 साली संचालक मंडळाचाही राजीनामा दिला.. आणि पूर्णवेळ त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलं.. आपली पत्नी मेलिंडा यांच्यासह ‘बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ची स्थापना केली..ही जगातील सर्वात मोठी धर्मादाय संस्था मानली जाते.. आपल्या संपत्तीमधील जवळपास 90 टक्के संपत्ती त्यांनी दान करण्याचे जाहीर केले आहे..

ते म्हणतात..मी माझ्या मुलांना फक्त 10 मिलीयन डॉलर ठेवून बाकी संपत्ती दान करणार आहे.. त्यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, दारिद्य्र निर्मूलन, लसीकरण आणि संसर्गजन्य रोगांविरोधातील लढा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगभरातून पोलिओचे जवळपास संपूर्णपणे निर्मूलन झाले आहे..

2010 साली बिल गेट्स आणि त्यांचे मित्र वॉरन बफे यांनी मिळून ‘द गिव्हींग प्लेज’ ही मोहीम सुरू केली.. त्यांनी या मोहिमेद्वारे जगातील अब्जाधीशांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या हयातीत अथवा मृत्यूनंतर आपल्या संपत्तीमधील किमान अर्धा हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान करावा.. त्यांच्या आवाहनाला जगातील शेकडो अब्जाधीशांचा प्रतिसाद लाभला..

बिल गेट्स हे आपल्या साधेपणासाठी देखील प्रसिद्ध आहेत..ते स्वत:ची भांडी स्वत:च धुतात आणि त्याचा त्यांना खूप अभिमान आहे.. त्यांची वाचनाची आवड पण सर्वश्रुत आहे.. आठवड्याला किमान दोन पुस्तकं तरी वाचतातच… आणि केवळ वाचतात असं नाही तर त्यातून नोट्सदेखील काढतात.. मायक्रोसॉफ्टमध्ये असताना ते सोळा तास काम करायचे..पण सध्या फक्त दहा तास काम करतात.. रोजच्या रोज किमान पन्नास साठ ईमेल वाचणं आणि त्याला उत्तरं देणं हा नियम ते कधीच चुकवत नाहीत..त्यांचा अजून एक नियम म्हणजे मुलांबरोबर डिनर करणं.. त्यावेळी मोबाईल टीव्ही बंद.. जेवताना रोजचा विषय ठरलेला..आज काय नवीन शिकलात?

बिल गेट्स आपल्या वागणुकीतून दाखवून देतात की श्रीमंतीचा खरा अर्थ बँक बॅलन्स नाही..तर तुम्ही तुमच्या पैशातून किती लोकांच्या चेहर्‍यावर हास्य आणले त्यावर आहे..

कर्णाने अंगावरील कवच कुंडले पण दान केली..
बिल गेट्स यांनी आपली 90 टक्के संपत्ती दान केली..
काळ वेगळा.. पण दानशूरता तीच..
हीच आहे आजची पैशाची गोष्ट..

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1How Rich Would Bill Gates Be Today If He Never Donated A Dollar To Charity?05.5203-08-2026
2Фонд Билла Гейтса увеличит до $250 млн пожертвования на борьбу с коронавирусом0016-04-2020
3Бывшая жена Билла Гейтса может покинуть их фонд через два года0008-07-2021
4Си Цзиньпин поблагодарил Билла Гейтса за помощь в борьбе с распространением коронавируса0022-02-2020
5WSJ: Гейтсу пришлось уйти из совета директоров Microsoft из-за служебного романа0017-05-2021
6СМИ: Джек Дорси покинул совет директоров Twitter0025-05-2022
7Nvidia стала первой в истории компанией с капитализацией в $4 трлн0009-07-2025
8Дворкович решил уйти с поста председателя фонда "Сколково"0018-03-2022
9Венчурный фонд сооснователя Mail.ru продал Amazon долю в разработчике "умных" роутеров0012-02-2019
10Георгиева оставляет пост исполнительного директора ВБ на время подбора нового главы МВФ0003-08-2019

Классификация: . Схожих патентов: 0. Схожих новостей: 10. Тональность: 0. Информативность: 13.42. Источник: www.mymahanagar.com.